Let's Change-स्वच्छता मॉनिटर
महाराष्ट्र शासनाने राज्यातील शाळांमध्ये दाखवण्यास परवानगी दिलेला स्वच्छता उपक्रमाविषयी मजेदार चित्रपट "लेट्स चेंज" खाली थेट पाहू शकता.
"लेट्स" चेंज उपक्रमाविषयी जाणून घ्या.....!!!
मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर अशी जबाबदारी स्वीकारण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम राबवण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. उपरोक्त प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर उपक्रमा मुख्य इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना केंद्रित करून राबविण्यात येणार आहे. यान्वये राज्यातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची आवश्यकता निर्माण करून परिसरात स्वच्छता टिकून राहावी यासाठी विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करणे अशी योजना आहे.
त्या अनुषंगाने संक्षिप्त योजना खालील प्रमाणे आहे.
1. 2020 पासून अनेक शाळा ऑनलाईन संप्रेषण पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांशी जोडल्या गेल्या आहेत. शाळेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ लिंक शेअर करावी, जी विद्यार्थ्यांनी पहावी.
2. स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी स्वीकारणे या कल्पनेचा परिचय मा. मंत्री शालेय शिक्षण यांच्या व्हिडिओ संदेश द्वारे करण्यात येईल.
3. संदेशानंतर याच लिंकवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 75 मिनिटांचा स्वयं स्पष्टीकरणात्मक मजेदार चित्रपट लेट्स चेंज प्रसारित केलेला जाईल.
4. सदर उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी लेट्स चेंज या चित्रपटानंतर लोकप्रिय व्यक्तींच्या व्हिडिओ संदेशातून विद्यार्थ्यांसाठी कृती योजनेच्या आराखड्याची माहिती देण्यात आली आहे.
5. कृती आराखड्याबद्दल शंकांचे स्पष्टीकरण देण्यासाठी वर्गशिक्षक यांनी संवाद सत्राची आयोजन करून विद्यार्थ्यांच्या शंकाची निरसन करावे. उपक्रमाच्या अंमलबजावणी विषयी माहिती द्यावी.
6. उत्तम कामगिरी करणाऱ्या स्वच्छता मॉनिटर यांचा जाहीर सत्कार करून त्यांना प्रोत्साहन द्यावे. अशी कार्यक्रम आयोजित केल्याने स्वच्छता मॉनिटर ची जबाबदारी सातत्याने निभावण्याची उत्सुकता बळकट होऊन विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची जाणीव निर्माण होईल.
7. विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवणे सर्वात योग्य आहे, कारण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण होणार व या वयोगटातील विद्यार्थ्यांकडून झालेल्या मनाईबद्दल किंवा व्यक्तीचा निष्काळजीपणा निदर्शनास आणून दिल्यास नागरिकांमध्ये या उपक्रमाचा अधिक प्रसार होईल. यामुळे परिसर स्वच्छ राहील आणि सफाई कर्मचाऱ्यांवर चा भार कमी होईल.
8. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी व्यक्तीचा निष्काळजीपणा निदर्शनास आणून दिल्यावर त्यांच्या असामाजिक वागणूक वागणुकीवर आळा बसेल या उपक्रमांतर्गत प्रसिद्धी, नियोजन व समन्वयासाठी लागणारा वित्त विषय खर्च सीएसआर उपक्रमांतर्गत जाहिराती आणि प्रायोजकांच्या द्वारे पूर्ण करण्यात येणार असून शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नाही, या अटीच्या आधी राहून सदर उपक्रम राबवण्यास परवानगी देण्यात येत आहे. तसेच सदर उपक्रम समाज उपयोगी असल्यामुळे उपरोक्त सूचना आयुक्त पुणे यांनी आपल्या स्तरावरून राज्यातील सर्व शाळांना द्याव्यात.
अधिक माहिती करिता खालील परिपत्रक पहा.
Vaibhav Dadarao Mapari
उत्तर द्याहटवाVaibhav Dadarao Mapari
हटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .